लवकरच भारतात परतणार इरफान खान!

0
4

अमरवाणी न्यूज,२४ ऑक्टो: लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, येत्या १-२ दिवसांत इरफान मुंबईला परतणार असल्याचे कळतेय. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, इरफानचा वैद्यकीय उपचाराचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता तो मुंबईत परण्याच्या तयारीत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत इरफान मुंबईला परतणार आहे. याशिवाय इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज आहे. होय, मुंबईत परतल्यानंतर काही दिवसांत इरफान ‘हिंदी मीडियम2’चे शूटींग सुरू करणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे शूटींग सुरू होईल, असे कळतेय. ‘हिंदी मीडियम’चे मेकर्स इरफानला भेटायला लंडनमध्ये गेले होते. येथे त्यांनी इरफानला ‘हिंदी मीडियम2’ची स्क्रिप्ट ऐकवली होती. ही स्क्रिप्ट आवडल्यामुळे इरफानने त्यात काम करण्यास होकार दिला होता.‘हिंदी मीडियम’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट होता. यातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात लीड भूमिकेत होती़. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.

इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेबु्रवारी २०१८ मध्येचं ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असेही जाहिर करण्यात आले होते. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यानंतर मेकर्सनी इरफारनकडे या चित्रपटाचा विषयही काढला नव्हता. आता इरफानच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होताच, मेकर्सनी अलीकडे त्याची भेट घेतली.
इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.