५० लाखांची रोकड घेऊन मुंबईत येणारी मुस्लिम टोळी ताब्यात

0
8

अमरवाणी न्यूज : १ जुलै – हरियाणा येथून मुंबई येथे नेत असलेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई  खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली.

हरियाणातील एका गाडीमध्ये रोख रक्कम जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अप्पर पोलीस अधिक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. खामगावपासून काही अंतरावर हरियाणातील डी.एल. सी. ए.एफ. ४९४३ क्रमांकांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये पोलिसांना ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दुल्ला मजीद, इरफान खान जाणू खान यांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय त्यांच्याकडून १ देशी कट्टा सुद्धा ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, पुढील कारवाई सुरू आहे. ही रक्कम कुणाकडे पाठवण्यात येत होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या रक्कमेचा उपयोग मुंबईत घातपात घडवून आणण्यासाठी करण्यात येणार होता का? याची तपासणी देखील करण्यात येत आहे.