हेडफोन लावून झोपल्याने शॉक लागून महिलेचा मृत्यू

0
11

अमरवाणी न्यूज,७मे- कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणं सर्वांनाच आवडतं. त्यामुळेच मग काही लोक प्रवास करताना तर काहीजण झोपताना गाणी ऐकतात. मात्र असं करणं जीवावर बेतू शकतं कारण असाच एक धक्कादायक प्रकार चेन्नईमध्ये समोर आला आहे. कानाला हेडफोन लावून झोपणं एका महिलेला चांगलचं महागात पडलं आहे. फातिमा असं ४६ वर्षीय महिलेचं नाव असून कानाला हेडफोन लावून त्या झोपल्या होत्या. त्याचदरम्यान शॉक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी चेन्नईतील कंथूर येथे ही घटना घडली. फातिमा यांचे पती त्यांना सकाळी उठवत होते. मात्र त्या उठल्या नाहीत त्यामुळे त्यांना संशय आला. शेजाऱ्यांच्या मदतीने फातिमा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर रुग्णालयानं याबाबत पोलिसांना माहिती दिली. शनिवारी रात्री फातिमा हेडफोन लावून झोपल्या होत्या. त्याचवेळी शॉर्ट सर्किट होऊन त्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.