हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर ज्युनिअर आर्टिस्टवर सामूहिक अत्याचार

0
10

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चित्रपटाच्या शुटिंगवेळी नाना पाटेकरने गैरवर्तन केल्याचे आरोपांमुळे चित्रपटसृष्टीतील वातावरण ढवळून निघाले असताना आता हाऊसफुल्ल 4 च्या सेटवर एका ज्युनिअर आर्टिस्टवर सहा जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. चित्रकूट स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.

पिडीत ज्युनिअर आर्टिस्ट सेटजवळ आपल्या सहकाऱ्यासोबत बसलेली असताना तेथे पवन शेट्टी आणि सागर यांच्यासह अन्य सहा जणांनी येऊन छेड काढली. तसेच तिच्या शरिराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या ज्युनिअर आर्टिस्टने रोखले असता शेट्टीने तिला ढकलून देत तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचा आरोप या ज्युनिअर आर्टिस्टने केला आहे.

या प्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून पिडीत तरुणीने आरोपींना गजाआड करण्याची मागणी केली आहे.