‘सेव्ह वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन’ने दिले अजगराला जीवनदान

0
9

अमरवाणी न्यूज, ०४ फेब्रुवारी : मुलुंड आणि नाहूरमधल्या कंटेनर यार्डमध्ये आढळलेल्या एका साडे नऊ फुटाच्या अजगराला सेव्ह वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना जीवनदान दिले. हा अजगर मुलुंड गोरेगाव ओलंडण्याचा प्रयत्नात असतांना त्या ठिकाणावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने त्याला पाहताच याची माहिती सेव्ह वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना दिली. या माहितीच्या आधारावर संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराचा शोध घेऊन त्याला यशस्वीरित्या वाचविले. हा अजगर इंडियन रॉक पायथॉन या प्रजातीचा असून त्याची लांबी साडेनऊ फुटाची आहे.