सानियाला पुत्ररत्नाचा लाभ; शोएबनं केलं ट्विट

0
3

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सानिया-शोएबला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. शोएब मलिकनं ट्विटर हॅण्डलवर ही गोड बातमी ट्विट केली आहे. शोएबच्या ट्विटनंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शुभेच्छांबद्दल शोएबनं सर्वांचे आभार देखील मानले आहेत.

बाळाला मिर्झा आणि मलिक ही दोन्ही आडनावं लावणार असल्याचं सानियानं गर्भवती असतानाच जाहीर केलं होतं. त्याचे पडसाद आताही ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. सानियाच्या गोड बातमीनंतर ट्विटरवर ‘बेबी मिर्झा मलिक’ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.

सानिया आणि शोएब यांचा २०१० साली निकाह झाला होता. पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत विवाहबद्ध झाल्यानं सानियाला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.