शेअर बाजारात तेजी; बीएसई 718 तर निफ्टी 221 अंकाची वाढ घेऊन बंद

0
5

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर मंदीचे सावट होते. बाजारात सातत्याने घसरण होत होती. परदेशी गुंतवणूकदारही बाजारातून पैसे काढत असल्याने बाजारावर त्याचा परिणाम होत होता. मात्र, सोमवारी बाजारात उत्साहाचे वातावरण होते. या आठवड्याची सुरुवात तेजीने झाल्याने बाजाराने उसळी घेतली आहे. मुंबई बाजरात 718.09 अंकाची वाढ नोंदवत बाजार 34,067.40 वर निफ्टी 221.30 अंकांची वाढ घेऊन 10,251.30 अंकांवर बंद झाला. बाजाराची सुरुवात तेजीने झाली. त्यानंतर काहीवेळ घसरण होत राहिली. त्यानंतर बाजारात तेजीचा माहौल होता. दुपारी 3.18 वाजता बाजारात 732.64 अंकांची वाढ होऊन 34,044.45 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी 227.65 अंकांची वाढ घेऊन10,257.65 वर पोहचला होता. बाजारात तेजी कायम असताना निर्देशाकांत 796 अंकांची वाढ दिसत होती.

सोमवारी झालेल्या व्यवहारात इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अदानी पोर्ट्स, अॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज, सिप्ला, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स आणि टीसीएसचे शेअर तेजीत होते. या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली. दुपारी 3.28 वाजता 31 पैकी 24 शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी होत होती. इतर सहा शेअरमध्ये थोडी घसरण झाली तर एका शेअरचा भाव स्थिर होता. तर निफ्टीच्या 50 शेअरपैकी 41 तेजीत होते. सात शेअरमध्ये थोडी घसरण दिसली. तर 2 शेअरचे भाव स्थिर होते.