शालेय जीवनावर आधारित बहुचर्चित ‘उबुंटू’चा ट्रेलर प्रदर्शित

0
11

अमरवाणी न्यूज, ११ सप्टेंबर – उबुंटू या नावाचा चित्रपट येणार म्हणून सगळ्यांनाच उत्सुकता होती. सर्वांच्या मनात पहिला प्रश्न आला असणार तो म्हणजे ‘उबुंटू’ शब्दाचा नेमका अर्थ काय? तर या चित्रपटाने नुकतेच प्रदर्शित केलेल्या ट्रेलरमध्ये सांगण्यात आले आहे की नेल्सन मंडेला यांनी ‘उबुंटू’ हा छानसा शब्द दिला ज्याचा अर्थ असा आहे ‘मी आहे कारण आम्ही आहोत’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ या चित्रपटात एक शिक्षक आणि उत्साही विद्यार्थी यांच्या माध्यमातून शाळेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शाळेत जर मन लावून अभ्यास करणारे विद्यार्थी असतील आणि त्याच जोडीला विद्यार्थींमध्ये मिसळून आपलेपनाने ज्ञान देणारे शिक्षक असतील तर आणखी काय हवं. शिक्षक-विद्यार्थी-शाळा यांच्यातील सुंदर नात दर्शविणारा ‘उबुंटू’.

स्वरुप रिक्रिएशन अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि फेबल फॅक्टरी निर्मित ‘उबुंटू’ या चित्रपटाची दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्रीने पेलली आहे. निर्मित ‘उबुंटू’ येत्या १५ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.