शाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय

0
5

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. भारतानं ठेवलेल्या ३२२ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून ३२१ रन केले. शाय होपनं १३४ बॉलमध्ये नाबाद १२३ रन केले. पण त्याला वेस्ट इंडिजला ही मॅच जिंकवता आली नाही. पहिल्या मॅचमध्ये शतकी खेळी करणाऱ्या हेटमेयरनं या मॅचमध्ये ६४ बॉलमध्ये ९४ रनची वादळी खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

विराट कोहलीच्या खणखणीत शतकामुळे भारतानं वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३२२ रनचं आव्हान ठेवलं आहे. विराटनं १२९ बॉलमध्ये नाबाद १५७ रनची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे ३७वं शतक आहे. भारतानं ५० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून ३२१ रन केले. पहिल्या मॅचमध्येही विराटनं शतक केलं होतं. पहिल्या मॅचमध्ये शतक करणारा रोहित शर्मा ४ रनवर आऊट झाला. अंबती रायुडूनं विराटला चांगली साथ दिली. रायुडूनं ८० बॉलमध्ये ७३ रनची खेळी केली.

वेस्ट इंडिजकडून नर्स आणि मॅकॉयनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर केमार रोच आणि मार्लोन सॅम्युअल्सला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. ५ मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं जिंकली आहे.