शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

6

सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार यांना मोठा झटका दिला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या याचिकेवर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. तुम्ही मोठं व्यक्तीमत्व असाल. तुम्ही मोठं व्यक्तीमत्व आहातच. आम्ही तुमचं का ऐकू? तुम्ही तुमचं म्हणणं मुंबई उच्च न्यायालयात मांडा, असं न्यायालयानं सांगितलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवून द्यायला उच्च न्यायालयानं परवानगी दिली नव्हती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शरद पवार यांची १७ जून २०१५ साली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. पण लोढा समितीच्या शिफारसीनंतर शरद पवार यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं एमसीए पदाधिकाऱ्यांच्या समितीचा कार्यकाळ वाढवायला नकार दिला होता. ही समिती एमसीएचं कामकाज पाहत होती. एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एच.एल. गोखले आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वी.एम. कानडे यांची समिती नियुक्त केली होती.

728×120-yss-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-fBc