विराट कोहलीची शतकांची हॅटट्रिक; कॅलिसशी बरोबरी

0
5

भारताचा कर्णधार विराट कोहली विंडीज विरुध्दच्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यात शतक ठोकले होते. आज त्याने तिसऱ्याही सामन्यात शतक ठोकत मालिकेत शतकांची हॅटट्रिक केली. विराटने पहिल्या सामन्यात १४० दुसऱ्या सामन्यात नाबाद १५७ धावांची खेळी केली. याचबरोबर विराटने पहिल्या कसोटीतही शतक झळाकावले होते. विंडीज दौऱ्यात त्याची कसोटी आणि एकदिवसीय  असे मिळून  ५ सामन्यात ४ शतके झाली आहेत.

भारताचा कर्णधार विराट कहलीने नुकताच एकदिवसीय सामन्यात १० हजार धावांचा टप्पा पार केला. याचबरोबर त्याने एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगाने १० हजार धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. एकदिवसीय सामन्यात ६० च्या सरासरीने खेळत असला विराट येथेच थांबला नाही तर त्याने सलग तीन सामन्यात मोठे शंभर करत शतकांची हटॅट्रिक केली. विंडीज विरुध्द अजून दोन एकदिवसीय सामने शिल्लक आहेत. त्यामुळे श्रीलंकेच्या कुमार संगकाराचे सलग चार शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

या सलग तिसऱ्या शतकाबरोबरच विराटने आपले ६२ आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. या शतकाने त्याने शतकांच्या शतकाच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसशी बरोबरी केली. आहे आता त्याच्या पुढे ६३ शतके करुन कुमार संगकारा एका शतकाने पुढे आहे. विराटचा फॉर्म पाहता तो याचा एकदिवसीय मालिकेत संगकारालाही गाठेल असे दिसते.

एकाच देशात सलग चार शतक

याचबरोबर विराटने या सामन्यात काही रेकॉर्डही केले आहेत. एकाच देशात सलग चार शतक करण्याचा विक्रम विराटने केला आहे. त्याने न्यूझीलंड विरुध्दच्या अखेरच्या कानपूर येथील वनडे सामन्यात ११३ धावांची खेळी केली होती. आणि आता विंडीज बरोबर सलग तीन शतके केली आहेत. याच बरोबर तो मायदेशात सलग शतके करणाऱ्यांच्या यादीत विराट ए बी डिव्हिलियर्स सोबत चार शतके करुन संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

एका संघाविरुध्द चार शतके करणारा विराट पहिला फलंदाज 

विराटने २०१७ ला किंगस्टनमध्ये विंडीजविरुध्द नाबाद १११ धावांची शतकी खेळी केली होती. आणि आता या मालिकेत त्याने विंडीज विरुध्द सलग तीन शतके केली. त्यामुळे विराट एकाच संघाविरूध्द  सलग चार शतके करण्याचा विक्रम केला. असा विक्रम करणारा विराट एकमेव आहे.