विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० नोव्हेंबर

0
6

राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार असून या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ९ दिवस चालणार आहे. त्यामुळे या विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला. १९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन होणार आहे. सुट्टीचे दिवस वगळता फक्त ९ दिवसच कामकाज चालणार आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.

राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असून या मुद्द्यावरुनच हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे जास्त आहेत.