लैंगिक शोषण : गुगलकडून ४८ कर्मचार्‍यांवर कारवाई

0
8

#MeToo या मोहिमेने दररोज नवीन आरोप, खुलासे अशा घटना घडत आहे. भारतात #MeToo मोहित सुरु असतानाच गुगलनेही आता लैंगिक शोषणाला विरोध दर्शवत ज्‍या कर्मचार्‍यांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत त्‍यांच्‍यावर गुगलकडून कारवाई करण्‍यात आली आहे.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्‍यामध्‍ये गुगल कंपनीतील १३ वरिष्‍ठ अधिकार्‍यांसह एकूण ४८ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढून टाकल्‍याची माहिती गुगलने दिली आहे. गेल्‍या दोन वर्षाच्‍या काळात या कर्मचार्‍यांचजर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

गैरवर्तणुकीच्‍या आरोपांमुळे गुगलेचे सकारात्‍मक पाऊल

गैरवर्तणुकीच्‍या आरोपांमुळे गुगलने ही भूमिका घेतले आहे, असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुंदर पिचई यांनी हे पत्र एका इंग्रजी वृत्तपत्राला वृत्ताला उत्तर देण्यासाठी लिहिण्यात आले आहे.

अँड्रॉइडचे निर्माते अँडी रुबिन यांना त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या बदल्यात ९० मिलियन डॉलरची भरपाई देऊन कामावरून काढून टाकण्यात आले असल्‍याचे या वृत्तात म्हटले होते. या वृत्तातील दावा रुबीन यांच्या प्रवक्त्याने फेटाळला आहे.रुबिन यांनी २०१४ मध्ये Playground हा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कंपनी सोडली होती. त्‍यानंतर त्यांना त्‍यांच्‍यासाठी फेअरवेल पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. असे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्‍या वृत्ताने म्‍हटले आहे.

चौकशीनंतरच निर्णय घेतल्‍याचे पिचई यांनी पत्रातून केले स्‍पष्‍ट

‘हा रिपोर्ट वाचणे त्रासदायक आहे आणि याप्रकारच्या प्रकरणांबाबत गुगल खूपच गंभीर आहे. कर्मचाऱ्यांना कामाच्‍या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे,’ असं पिचई यांनी म्हटले आहे. ‘लैंगिक शोषणाशी संबंधित प्रत्येक आरोपाची आम्ही चौकशी केली आहे आणि चौकशीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे,’ असं पिचई यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

२०१३ मध्ये एका महिलेने रुबिन यांनी हॉटेलात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची निश्चिती केल्यानंतर गुगलचे तत्कालीन सीईओ लॅरी पेज यांनी रुबिन यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितले होते, असे या इंग्रजी वृत्तपत्राने या वृत्तात म्‍हटले आहे.

गुगलने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही

‘मी कोणतंही गैरवर्तन केलेले नाही आणि मी स्वत:हून गुगल सोडत आहे,’ असे रुबिन यांनी म्हटले होते.