लग्नासाठी दीपिका-रणवीर इटलीसाठी रवाना

0
4

दिवाळी संपली. आता वेध लागलेत लग्नाचे. रणवीर-दीपिकाची लग्नघटिका जवळ यायला लागली. सगळ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवतोय. फॅन्स दोघांचे काय अपडेट्स येतायत, याकडे लक्ष ठेवून आहेत.

तर बातमी अशी आहे, बॉलिवूडची हिट जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नासाठी इटलीला रवाना झालीय.दोघांचं लग्‍न १४ आणि १५ नोव्‍हेंबरला इटलीमध्‍ये होणार आहे. रणवीर-दीपिका इटलीत लग्‍न केल्‍यानंतर पहिलं रिसेप्शन दीपिकाच्‍या घरी अर्थातच बंगळुरूमध्‍ये आयोजित केलं जाणार आहे.

रिसेप्शननंतर दोघं मुंबईला परतणार आहेत. रणवीर आपल्‍या नव्‍या घराच्‍या शोधात आहे. नवे घर मिळेपर्यंत रणवीर आणि दीपिका हे दोघं दीपिकाच्‍या घरी राहणार आहे. दीपिकाचं एक घर मुंबईमध्‍ये आहे, जेथे ते दोघे आपला संसार मांडणार आहेत. दीपिकाचं घर मुंबईतील प्रभादेवी अपार्टमेंटमध्‍ये आहे.