रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

0
3

रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर ते विद्याविहार स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटाने उशीराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

आज सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल सोमवारी म्हणजे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाट धुक्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. जवळपास 10 मिनिटं गाड्या उशीराने धावत होत्या. सातत्याने खोळंबा होत असल्याने प्रवासी वर्गाकडून मध्य रेल्वेविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.