राहुल गांधींचा पुन्हा गोंधळ; मिझोरमला केले मणिपूर

0
7

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर पुन्हा गोंधळ घातला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील दोन राज्यांमध्ये गफलत केली. नंतर त्यांनी हा ट्विट डिलीट केला. पण, भाजपच्या आयटी सेलच्या नजरेतून हे सुटले नाही. या प्रकरणी त्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.

राहुल गांधी यांनी सोमवारी मिझोरम मधील एका सैनिक शाळेने जवळपास ५० वर्षानंतर आपल्या शाळेची दारे मुलींसाठी खुली केली. याबाबतची माहिती देणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले. पण, अनावधानाने त्यांनी मिझोरम ऐवजी मणिपूर राज्यातील शाळा असा उल्लेख केला. पण, आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी लगेच हे ट्विट डिलीट केले.

काँग्रेस पर्यायाने राहुल गांधींच्या हालचालींवर करडी नजर ठेवणाऱ्या भाजप आयटी सेलच्या तीक्ष्ण नजरेतून ही चूक सुटली नाही. भापचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या ट्विटचा स्क्रिनशॉट काढून शेअर केला. याचबरोबर त्यांनी ‘ईशान्येकडील राज्यांकडे दुर्लक्ष करणे हे ‘प्रोब्लेमेटिक’ आहे.’ अशी खोचक टीका केली.

राहुल गांधी यांनी अशा प्रकारच्या चुका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापुर्वीही महागाईविषयी चुकीची आकडेवारी देणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त करत नवीन ट्विट केले होते.