राज्य दुष्काळ निवारण समितीची सोमवारी बैठक

0
6

राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात होत आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर या बैठकीत मंथन होणार आहे.

पावसातील खंड, भूजल पातळी,जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याच्या पृष्ठभूमीवर, राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात गत २३ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. त्यानुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक सोमवार, २९ आॅक्टोबर रोजी मुंबईतील मंत्रालयात होत आहे.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे उत्पादन व उत्पन्नाचा आढावा आणि दुष्काळ निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.