राखी सावंतचा तनुश्री दत्तावर बलात्काराचा आरोप

0
2

काही दिवसांपूर्वी अभिनेता नाना पाटेकर यांच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यामुळे अभिनेत्री तनुश्री दत्ता चर्चेत आली होती. या तनुश्री दत्ताने राखी सावंतवर बदनामी केल्याचा आरोप लावला आहे. तनुश्री म्हणते की, राखीने माझ्यावर गंभीर आरोप लावले आहेत आणि माझी प्रतिमा खराब केली आहे. मात्र आता राखीने अतिशय गंभीर आरोप तनुश्रीवर लावले आहेत.

बुधवारी राखी सावंत तनुश्री दत्ता विरोधात #SheToo ही चळवळ सुरू केली आहे. राखीचा आरोप आहे की, तनुश्रीने अनेकदा मला रेव पार्टीला घेऊन गेली. तनुश्री अनेकदा ड्रग्स घेतले असून मला देखील जबरदस्तीने दिले आहे. तसेच राखीने आरोप केला आहे की, तनुश्रीने तिच्या प्रायव्हेट पार्टला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर गँगरेप करण्याची धमकी दिली.

राखीने सांगितलं की, तनुश्रीने माझ्यावर 10 करोड रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. आता मी तिच्यावर 50 करोड रुपयांचा दावा करत आहे. राखीने मीडियासमोर रडत ही गोष्ट सांगितली. एवढंच काय तर तनुश्री लेस्बियन असल्याचं देखील सांगितलं.