मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन मुलीने अपलोड केले अश्लील फोटो

0
7

मैत्रिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अश्लील फोटो अपलोड केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीला अटक झाली आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर या मुलीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली असून तिची कसून चौकशी सुरू आहे. एखाद्या मुलीने अशा प्रकारचं कृत्य करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्यात एका मुलीने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार पोलिसांच्या सायबर सेलला केली होती. अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याच्यावर अश्लील फोटो शेअर केले जात होते तसेच लोकांना अश्लील मेसेजही पाठवले जात होते. या मुलीची कॉन्टॅक्ट लिस्ट आणि इन्स्टाग्राम फॉलोअर्स तपासत असताना पोलिसांना तो आयपी अॅड्रेस सापडला ज्यावरून हे फोटो अपलोड होत होते. त्यावरून पोलिसांना या अल्पवयीन मुलीला अटक केली. सध्या तिची चौकशी सुरू असून पोलीस या मागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.