मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

0
11

बिहारमधील मुझफ्फरपूर शहराचे माजी महापौर समीर कुमार (वय ५०) आणि त्यांचा चालक रोहित कुमार (४०) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी रायफलीतून एकूण १७ ते १८ फैरी झाडल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक मुकुल रंजन यांनी दिली आहे. समीर कुमार हे २००२ ते ०७ या काळात मुझफ्फरपूरचे महापौर होते. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले. अग्निशामक दलाच्या कार्यालयाजवळ सकाळी ७ वाजता ही घटना घडली.