मुंबईत लागणार आणखी ५ हजार सीसीटीव्ही

0
7

अमरवाणी न्यूज,२४ ऑक्टो: गुन्हेगारीशी दोन दोन हात करण्यासाठी मुंबईत आता आणखी ५ हजार सीसीटीव्ही लागणार आहेत. सध्या मुंबईत ४,७१७ सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यात आता आणखी ५००० कॅमेऱ्यांची भर पडणार आहे.

सीसीटीव्हीचं हे नेटवर्क ‘डायल १००’  या उपक्रमाशी जोडलं जाईल. त्यामुळे पोलिसांचा प्रतिसाद वेळ अवघ्या १२ मिनिटांवर येईल. मंत्रीमंडळाने काल झालेल्या बैठकीत याला मान्यता दिलीय. यासाठीच्या खर्चात ९८० कोटींची वाढही मंजूर करण्यात आली आहे.

मुंबई सारख्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलली गेली पाहिजेत. २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ६ जानेवारी २०१२ ला मुंबईसाठी ६०० कोटी रूपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाला मंजुरी दिली होती.