मुंबईत काँग्रेसची 14 नोव्हेंबरला बैठक, आघाडीचा निर्णय बैठकीत होणार

0
7

नगर महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जागा वाटपाची प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या उद्देशाने आणि आघाडीचा निर्णय निश्‍चित करण्यासाठी येत्या 14 नोव्हेंबर रोजी मुंबईत पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आयोजित केली आहे. या बैठकीची माहिती प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक शामराव उमाळकर यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना दिली आहे. दरम्यान, लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला नसल्यानेचे आता मनपाच्या जागेवरुनही तिढी निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

महानगरपालिका निवडणूकीसाठी येत्या 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. पक्षाकडे उमेदवारी मागणार्‍या इच्दुकांनी कागदपत्रांची सर्व पुर्तता करुन उमेदवारी अर्ज दाखल करावेत व सदरची माहिती पक्षाला द्यावी असे उमाळकर यांनी पत्रकात म्हंटले आहे.

तसेच पक्षाने आघाडीचा निर्णयासाठी पंडित नेहरू जयंतीचा मुहुर्त साधून आयोजित केलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, निरीक्षक उमाळकर , युवक प्रदेश काँग्रेसचेअध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार सुधीर तांबे, डॉ.सुजय विखे पाटील, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याचे वाटत होते मात्र आजपर्यंत त्यांची चर्चा प्रत्यक्ष झाली नाही, त्यामुळे उलट – सुलट चर्चा अथवा वृत्तांना वाब मिळाला मात्र आता प्रत्यक्षात जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात आणि निर्णयही त्वरीत होण्याची शक्यता आहे. अशी पृष्टी पत्रकात देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नगर दक्षिण मतदार संघात आपली उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजुन डॉ.सुजय विखे यांनी एक प्रकारे कार्यक्रमांना उपस्थिती राहून दक्षिणेत आपले पाय रोवले होते, मात्र, यानंतर राष्ट्रवादीनेही या जागेवर आपला दावा सांगितल्याने चांगलाच पेच निर्माण झाला होता. मात्र,14 च्या बैठकीत यावर तोडगा निघणार असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे महारनगरपालिकेच्या जागे वाटपाच तिढा सुध्दा सुटणार की नाही या बाबत उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.