मिताली राजची शतकी खेळी, दोन विक्रमांना गवसणी

8

अमरवाणी न्यूज,२४ ऑक्टो: भारतीय महिला संघातील अनुभवी फलंदाज मिताली राजने बुधवारी विक्रमाला गवसणी घातली. भारत A आणि ऑस्ट्रेलिया A यांच्याली ट्वेंटी-20 सामन्यात मितालीने शतकी खेळी साकारताना भारताच्या विजयाचा पाया रचला. तिच्या या शतकाच्या जोरावर भारत A संघाने 20 षटकांत 5 बाद 184 धावांचे लक्ष्य उभे केले. ऑस्ट्रेलियाच्या महिलांना 20 षटकांत 9 बाद 156 धावांवरच समाधान मानावे लागले.

मितालीने 61 चेंडूंत 18 चौकार आणि 1 षटकार खेचताना नाबाद 105 धावांची खेळी केली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरने 57 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. तिनेही 32 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचले. ऑस्ट्रेलिया A संघाच्या तहलीया मॅक्ग्राथने ( 47) एकाकी झुंज दिली.

मितालीने शतकी खेळीसह दोन विक्रम नावावर केले. भारताकडून ट्वेंटी-20 महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीचा विक्रम मितालीच्या नावावर नोंदवला गेला. स्मृती मानधनाने याच वर्षी वेस्टर्न स्ट्रॉर्म क्लबकडून 102 धावा केल्या होत्या. त्याशिवाय ट्वेंटी-20 प्रकारात दोन शतक करण्याचा मानही मितालीने पटकावला. यापूर्वी 2017-18 च्या हंगामात रेल्वेकडून खेळताना नाबाद 100 धावा केल्या होत्या.

728×120-yss-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-fsK