माजी खासदार वाय.जी. महाजन यांचे निधन

0
8

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार वाय.जी. महाजन ( वय ७८) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, २९ आॅक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. नशिराबाद येथे सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

गेल्या दीड महिन्यापासून ते आजाराने त्रस्त . मुंबई येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, पुत्र जितेंद्र, मुलगी लीना, स्रुषा कविता, नात यतिषा, दोन भाऊ, दोन बहिणी नातवंडे असा परिवार आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातून ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शांत, संयमी असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते.