मनीषकुमार सिन्हा यांनी स्वीकारला सीबीआयचा पदभार

0
3

मनीषकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी सीबीआयच्या नागपूर शाखा प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी समीक्षा बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण प्रकरणांची माहिती घेतली.

सीबीआय नागपूरला सिन्हा यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमहानिरीक्षक रँकचे प्रमुख मिळाले आहेत. ते भारतीय पोलीस सेवेतील २००० मधील बॅचचे अधिकारी आहेत. ते आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची सीबीआयमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. आॅगष्ट-२०१७ मध्ये नागपूर शाखेत विजयेंद्र बिदारी यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांची बेंगळुरू येथे बँक गैरव्यवहार शाखेत बदली करण्यात आली. तेव्हापासून बिदारी नागपूर शाखेचा अतिरिक्त पदभार सांभाळीत होते. कामकाजाचा विचार करता नागपूर शाखा अत्यंत महत्त्वाची आहे. एकेकाळी या शाखेने लाचलुचपत व बेहिशेबी मालमत्ता गोळा करण्याच्या प्रकरणात विक्रमी गुन्हे नोंदवून इतर शाखांना बरेच मागे टाकले होते.