भीमा कोरेगाव प्रकरण आणखी काही जण रडारवर : मुख्यमंत्री

0
4

भीमा कोरेगावप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या या प्रकरणातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भीमा कोरेगावप्रकरणी आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. अटक करण्यात आलेले संत नाहीत. देशामध्ये यांच्याकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ते भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी नसतील; पण तशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये त्यांचा हात असू शकतो, अशी शंका मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केली. दरम्यान, सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव अगोदरच केंद्राकडे गेलेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने आणखी माहिती मागवली आहे. आम्ही केंद्राला सहकार्य करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.