भारतीय सैन्याने घेतला बदला, पाक जवानांच्या मुख्यालयावर केला हल्ला

0
4

भारतीय लष्कराने पुँछ आणि झल्लासमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेतला आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या प्रशासकीय मुख्यालयावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिर (POK) च्या खुईरत्ता आणि समानी भागात ही कारवाई केली.

पाकिस्तानी सैन्याने २३ आॅक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील पुँछ सेक्टरमध्ये ब्रिगेड मुख्यालय आणि भारतीय सैन्यावर गोळीबार केला होता.

पुँछ आणि झल्लासमध्ये २३ आॅक्टोबरला पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने पाकच्या सैन्य प्रशासकीय मुख्यालयावर गोळीबार करून कडक संदेश दिला. तसंच सीमेलगतच्या गावात राहणाऱ्या नागरिकांनी धुराचे लोट दिसत असल्याची माहिती दिली.

पाक सैन्याने वारंवार भारतीय सैन्याला चेतावण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने संयमाने सामना केला असं सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय सैन्याने हजिरा, बांदी गोपालपूर, निकियाला, समानी आणि खुइरत्ता या पाकव्यापत नियंत्रण रेषा (एलओसी) लगत भागात ही कारवाई करण्यात आली.