बँक आणि पोस्टात एफडी करणाऱ्यांसाठी खुशखबर, 1 एप्रिलपासून होणार फायदा

0
12

बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये फिक्स्ड (FD) डिपाॅझिट करणाऱ्यांसाठी आता खुशखबर. 1 फेब्रुवारीला झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात 40 हजार रुपयापर्यंत फिक्स्ड डिपाॅझिट ठेवलं तर मिळणारं व्याज करमुक्त आहे. सध्या मिळणाऱ्या व्याजावर 10 टक्के TDS पडतो. पण आता बदल होणार आहे. एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय.

किती एफडी केली तर मिळणारं व्याज करमुक्त होईल?

तज्ज्ञांच्या मते तुम्ही 5 लाखांची एफडी कराल तर त्यावर 8 टक्के दरानं व्याज मिळेल. आता नव्या नियमानुसार 8 टक्के व्याज मिळेल आणि त्यावर TDS कापला जाणार नाही.

बजेटमध्ये झालेल्या या बदलामुळे माझ्या एफडीच्या व्याजावर काय परिणाम होणार आहे?

TDSमधली सूट ही चौपट आहे. आता तुम्ही बँक आणि पोस्टात एफडी केली असेल तर 40 हजारापर्यंतच्या व्याजावर TDS बसणार नाही. यामुळे आता लोक FD कडे जास्त वळतील, असं म्हटलं जातंय.

याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना किती होणार?

जास्त फायदा त्यांनाच होणार. कारण आतापर्यंत TDS कापला जाऊ नये म्हणून ठराविक रकमेनंतर फाॅर्म भरावा लागायचा. पण आता 40हजार व्याजापर्यंत निश्चिंती आहे.

सरकारनं हे पाऊल का उचललं?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आजही लोकांचा बँक किंवा पोस्टातल्या गुंतवणुकीकडे कल आहे. विश्वास आहे. लोक सरकारी बँकांमध्ये जास्त एफडी ठेवतात. आता जास्तीत जास्त लोक FD कडे वळावेत म्हणून सरकारनं हे पाऊल उचललंय.

हल्ली लोक म्युच्युअल फंडात जास्त गुंतवणूक करतात. गेल्या आर्थिक वर्षात बँकांनी 7.5 लाख कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्यांना फक्त 5 .6 लाख कोटींचं डिपाॅझिट मिळालं होतं. म्हणूनही बजेटमध्ये ही तरतूद केलीय.