पोलीस बंदोबस्तात नाशिकमधून ‘जायकवाडी’ला पाणी सोडणार

4

नाशिकमधल्या धरणांतून जायकवाडीकरता पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून, पाणी सोडलं जाणार आहे. यावेळी गोदावरी नदीकाठावरच्या शेतकऱ्यांना पाणी न उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी तसंच पोलीस बंदोबस्तात पाण्याचा हा विसर्ग होणार आहे.

त्यानंतर दोन दिवसांच्या फरकानं म्हणजेच २ नोव्हेंबरपर्यंत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात हे पाणी मिळणं अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.

जायकवाडीचे धरण भरेल असे प्रकल्प आपण नाशिक जिल्ह्यात करत असून यासाठी तीस हजार कोटी रुपये नियोजित केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. दमणगंगापिजाळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला असून २०,००० कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

728×120-jaymobile-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-ftQ