पुलवामा येथे चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
4

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पुलवामा जिल्ह्यातील टिकून या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शनिवारी पहाटे शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून अजूनही परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी संध्याकाळी त्राल येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत ‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.