‘पिंपरी पालिकेत माझ्यामुळेच सत्ता अशा भ्रमात कोणी राहू नये’ – बापट

0
12

अमरवाणी न्यूज, २८ सप्टेंबर – पिंपरी-चिंचवड महापालिकेत काय होते, काय घडते. याची बित्तंबातमी माझ्याकडे येते. महापालिकेत माझ्यामुळे सत्ता आली आहे. त्यामुळे मी म्हणेन तीच पूर्वदिशा असे कोणी करु नये. भाजपच्या नावाने कोणी गैरकारभार करु नये. पक्षाचे तुमच्यावर बारीक लक्ष आहे. पक्षाच्या नावाने गैरकारभार करणा-याला घरचा रस्ता दाखविण्यात येईल. पिंपरी महापालिकेत माझ्यामुळेच सत्ता आली आहे, अशा भ्रमात कोणी राहू नये, अशा शब्दात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवड शहर आणि पालिकेतील पदाधिका-यांना झापले, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शहर भाजपाची आज (बुधवारी) कासारवाडी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, उमा खापरे, आझम पानसरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार यांच्यासह आदी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता आली. मात्र, काही पदाधिकारी आपल्यामुळेच पालिकेत भाजपची सत्ता आल्याचा दावा करत होते, हाच धाग पकडून पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, भारतीय जनता पक्ष खूप मोठा पक्ष आहे. देशभरात भाजपची सत्ता आहे. पारदर्शक कारभार करण्यासाठी जनतेने भाजपच्या हाती पालिकेची सत्ता दिली आहे. त्यामुळे पालिकेत आपल्यामुळेच सत्ता आली आहे, असे कोणी समजू नये. त्यामुळे आपण म्हणेन तीच पूर्वदिशा, आपण सांगेल तीच कामे होणार, असे चालणार नाही.

महापालिकेत काय होते, काय घडते. याची बित्तंबातमी माझ्याकडे येते. पक्षाचे पदाधिका-यांवर बारीक लक्ष आहे. पक्षाच्या नावाने गैरकारभार करणा-याची गय केली जाणार नाही. माझ्यामुळेच पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आली आहे, अशा भ्रमात कोणी राहू नये, अशा शद्बांत त्यांनी शहर पदाधिका-यांना झापले, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश यांनी खासदार, आमदार, नगरसेवकांची बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.