पिंपरीतील दळवीनगरमध्ये अग्नितांडव, दोघांचा मृत्यू

6

पिंपरीतील दळवीनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला असून या अग्नितांडवात पाच घरं जळून खाक झाली आहेत. प्रदीप मेटे आणि शंकर क्षीरसागर अशी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

दळवीनगर झोपडपट्टीतील एका घरात गुरुवारी पहाटे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. ही आग लगतच्या घरांमध्येही पसरली. या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून आगीत पाच घरं जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

 

728×120-yss-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-fto