पाकिस्तानात हिंदुस्थानी चित्रपट व मालिकांवर बंदी

0
5

पाकिस्तानमधील दहशतवाद दाखविणाऱ्या बॉलिवूड चित्रपट व मालिकांवर आतापर्यंत पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात येत होती. मात्र आत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानातील सर्व मालिक व चित्रपटांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील बॉलिवूडच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

पाकिस्तानातील युनायटेड प्रोड्युसर्स असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात विदेशी मालिका चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना पाकिस्तानचे सरन्यायधीश साकिब निसार यांनी हा निर्णय देताना हिंदुस्थानवर टीका देखील केली. जर हिंदुस्थान सिंधू नदीवर धरण बांधण्यापासून आपल्याला रोखू शकतो तर आपण त्यांच्या चित्रपटांवर देखील बंदी घालू शकतो, असे ते म्हणाले.

पाकिस्तानने याआधी पॅडमॅन, एजंट विनोद, एक था टायगर, टायगर जिंदा है, बेबी, नाम शबाना अशा चित्रपटांवर बंदी घातली होती.