पंतप्रधान मोदींचा जपान दौरा, भारत आणि जपानमध्ये होणार विविध करार

0
6

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींचे भरगच्च कार्यक्रम आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त जपानच्या यामानाशी येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

यामानाशी येथे पंतप्रधान मोदीचं आगमन झालं असून त्यांनी जपानचे पंतप्रधान जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली. दुपारी भारत आणि जपानमध्ये विविध करार होणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मोदी टोकियोहून भारतात परतणार आहेत.