नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

0
4

भारत आणि विंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका सुरू आहे. यातील तिसरा एकदिवसीय सामना पुण्यात खेळला जात आहे. कसोटी मालिका २-० अशी निराशाजनक पद्धतीने गमावल्यानंतर पहिला एकदिवसीय सामनाही विंडीजने गमावला. पण दुसऱ्या सामन्यात ३००हून अधिक धावांचा पाठलाग करताना त्यांनी सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. त्यामुळे विंडीजच्या संघाचे मनोधैर्य वाढले असून आजच्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने त्यांचा संघ मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे ३२१ धावांचा समर्थपणे बचाव न करता आल्याने या सामन्याच्या माध्यमातून पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करण्याचे आव्हान भारतापुढे आहे.