नागपूरमधून पुन्हा दोन ISI एजंट्सना अटक

0
5

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या दोन हस्तकांना मिलिटरी इंटेलिजंसच्या अधिकार्यांनी धडक करवाई करत नागपूरातून अटक केली आहे. नागपूरातली ही दुसरी घटना आहे. गेल्याच महिन्यात निशांत अग्रवालला अटक करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गणेशपेठ परिसरात 5 आयएसआय एजंट्सच्या वास्तव्याची माहिती मिळताच मिलिटरी इंटेलिजंसच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत त्यांना अटक केलीये. ५ पैकी २ जणांना अटक केली असून ३ जणांचा शोध सुरू आहे.

दरम्यान ताब्यात घेतलेल्या 2 आयएसआयच्या एजंट्सना सैन्याच्या ऑफिसमध्ये अधिक चौकशी साठी नेण्यात आले आहे. मागील महिन्यात डीआरडीओच्या नागपूर ब्रम्होसमधुन निशांत अग्रवाल या इंजिनीअरला आएसआयचा एजंट असल्याच्या आरोपावरून नागपूरातून अटक करण्यात आली होती. त्यांनतर ही मोठी कारवाई झाल्याने नागपूरात आयएसआयच्या कारावायांचे प्रमाण वाढत चालल्याचं दिसत आहे.

मध्य नागपुरातल्या भालदार पुरात अटकेची ही कारवाई कारण्यात आली. दरम्यान, मागच्याच महिन्यात डीआरडीओच्या नागपूर जवळील मोहगाव येथील ब्राह्मोस प्रकल्पातील निशांत अग्रवाल या तरुणाच्या अटकेनंतर भारतीय सैन्याच्या आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली होती. मेरठ छावणीच्या सिग्नल रेजिमेंटच्या सैनिकांसंबंधी महत्त्वाची माहिती तो शत्रू देशांना पुरवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटच्या सैनिकांवर तो नजर ठेवून होता आणि छावण्यांतील महत्त्वाची माहिती आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणांना पुरवत होता.

महत्त्वाची माहिती पुरवल्याच्या आरोपावरून या जवानाला अटक करण्यात आली होती. या जवानावर एटीएस आणि मिलेट्री एजेन्सी खूप दिवसांपासून नजर ठेवून होती. अखेर त्याला आज एटीएसने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती.