नवऱ्याने लपवली जात; पत्नीची पोलिसात तक्रार

0
4

पतीने आपली जात ब्राह्मण असल्याचं सांगत त्याची खरी जात लपवल्यामुळे पत्नीने फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याची खळबळजनक घटना गुजरातमधील मेहसाणामध्ये घडली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पीडित युवतीच नाव एकता पटेल आहे. २३ वर्षांच्या एकता पटेलने मागच्यावर्षी एमकॉम पूर्ण केलं. तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. याच दरम्यान तिला यश भेटला ज्याने त्याचं आडनाव मेहता सांगितलं. तसंच आपण ब्राह्मण असल्याची खोटी माहिती दिली. यामुळेच ती त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. दोघांचं लग्नही व्यवस्थित पार पडलं. दोघांनी मेहसाणा कोर्टात जाऊन लग्न रजिस्टरही केलं. पण लग्नानंतर शेजारच्यांनी काही दिवसांत तिला तिच्या नवऱ्याचं आडनाव खमार असल्याचं सांगितलं. तसंच तो ब्राह्मण नसून कछिया जातीचा असल्याची माहिती दिली. या वृत्ताची खात्री पटल्यावर ती चिडली. तिने कुटुंबीयांनी माहिती देऊन यश मेहता उर्फ खमार विरोधात पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली. ‘याप्रकरणामुळे मी प्रचंड दुखावले आहे’ अशी भावनाही तिने व्यक्त केली आहे.