तुमचाही दाभोळकर करु; छगन भुजबळांना धमकी

0
2

मनुस्मृतीला विरोध केलात तर तुमची अवस्थाही दाभोलकर आणि पानसरे यांच्यासारखी करु, अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात आली आहे. नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या पत्रात संभाजी भिडेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यावरूनही भुजबळांना धमकावण्य़ात आले आहे. गुरुजींचे कार्य तुला कळणार नाही. यापुढे त्यांच्याबद्दल एखादे अवाक्षर काढले तर तुम्हाला संपविण्यासाठी वेळ लागणार नाही, असा मजकूर या पत्रात आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे ‘भुजबळ फार्म’वर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.