तळोजा एमआयडीसीत स्फोट, १४ गावांमध्ये भूकंपासारखे धक्के

0
7

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत सोमवारी सकाळी मोठा स्फोट झाला असून या स्फोटामुळे कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये भूकंपासारखे धक्के बसल्याचे वृत्त आहे. हा स्फोट कोणत्या कंपनीत झाला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

तळोजा नावाडा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट झाल्याचे प्राथमिक वृत्त असून या दुर्घटनेत एक कर्मचारी जखमी झाला आहे. सकाळी नाश्त्याची वेळ असल्याने कंपनीतील बहुसंख्य कर्मचारी बाहेर गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जाते. या स्फोटात जेसीबीचा चालक जखमी झाल्याचे कंपनीमधील सूत्रांनी सांगितले. या स्फोटामुळे

दरम्यान, या स्फोटानंतर या भागांमधील ग्रामस्थ आक्रमक झाले. ही कंपनी बंद करावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी कंपनीबाहेर निदर्शनं केली. कल्याण तालुक्यातील आगासन गावापर्यंत या स्फोटामुळे भूकंपासारखे हादरे जाणवले.