तब्बल 21 वर्षांनंतर CID मालिका होणार बंद

4

सोनी टीव्ही वरील सीआयडी (CID) मालिकेने 20 वर्षांचा प्रवास पूर्ण केलायं. पण आता या मालिकेचे काही शेवटचे भाग आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या दिवसात ही मालिका बंद करण्यात येणार आहे. बी.पी.सिंग आणि प्रदीप उपौर यांनी या मालिकेची निर्मिती केली. फायरवर्क्स प्रोडक्शन अंतर्गत या मालिकेने 1,546 एपिसोड पूर्ण केले. शनिवार आणि रविवार रात्री 10.30 वाजता सोनी टीव्ही वर दिसणारी ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर उचलून धरली.

यामुळेच या मालिकेने इतके वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. tellychakkar या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलंय. 27 ऑक्टोबर या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

मालिकेचं यश

या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न आणि दया यांचे कॅरेक्टर अनेक सिनेमात दिसले. अनेक कॉमेडी शो, स्टे शो मध्येही ही नावं वापरली जातात. चोर-पोलीस असा संदर्भ देण्यासाठी या नावांचा किंवा मालिकेचा संदर्भ बऱ्याचदा घेतला जातो. या सर्वांमध्येच या मालिकेचं यश आहे.

728×120-yss-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-frJ