‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ तब्बल ५ हजार स्क्रिन्सवर झळकणार !

0
6

प्रेक्षकांमध्ये बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. महानायक अमिताभ बच्चन आणि आमिर खानची जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे हा चित्रपट चित्रपटाच्या निर्मात्यांनी तब्बल ५,००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ हा चित्रपट यावर्षीचा बिग बजेट चित्रपट आहे. वेगवेगळ्या प्रकारे या चित्रपटातील एकेक पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रोडक्शनपासून प्रमोशनपर्यंत चित्रपटाचे निर्माते कुठलीही कसर बाकी ठेऊ इच्छित नाहीत. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा याकरिता हा चित्रपट ५,००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट समीक्षाकार तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे. यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ बॉक्स ऑफिसवर कशाप्रकारे धुमाकूळ घालेल हे पाहणे रंजक ठरेल.