टी-10 लीगमध्ये खेळणार दिग्गज क्रिकेटपटू

7

आगामी महिन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे नकाब शाहजी उल मुल्क टी-10 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळताना दिसणार असल्याने क्रिकेटशौकिनांसाठी ही एक पर्वणीच असेल. 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथील शारजा क्रिकेट स्टेडियमवर ही टी-10 क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींना ‘सोनी लाइव्ह’ वाहिनीवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) या लीगला मान्यता असून 2017 मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे या लीगचा पहिला हंगाम खेळकण्यात आला होता.

आठ संघांमध्ये रंगणार स्पर्धा
या लीगचा पहिला हंगाम चार दिवसच खेळवण्यात आला होता, परंतु आता ही स्पर्धा दहा दिवस चालणार आहे. आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून, एकूण 29 सामने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत केरळा किंग्ज, पंजाब लीजंड्स, मराठा अरेबियन्स, बंगाल टायगर्स, दी कराचीयन्स, राजपूत, नॉर्दर्न कॉरियर्स आणि पखतून्स हे आठ संघ सहभागी झाले आहेत. यंदाच्या हंगामात कराचीयन्स आणि नॉर्दर्न कॉरियर्स या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार खेळाडूंचा सहभाग
या लीगमध्ये हिंदुस्थानचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी, माजी कर्णधार शोएब मलिक, वेस्ट इंडिजचे सुनील नरीन व डॅरेन सॅमी, इंग्लंडचा इयॉन मॉर्गन आणि अफगाणिस्तानचा राशिद खान हे खेळाडू सहभागी होणार आहेत.

728×120-jaymobile-012018-1

Comments are closed.

https://wp.me/p8vtBO-frd