जुन्या वाहनांना सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीत बंदी

0
17

दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) १५ वर्षांहून जुनी पेट्रोलवर चालणारी वाहने आणि १० वर्षांहून जुनी डिझेलवर चालणारी वाहने यांना रस्त्यांवर उतरण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बंदी घातली. अशी वाहने रस्त्यांवर चालवल्यास ती जप्त करावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिल्ली परिवहन विभागाला दिले आहेत.

दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसरात प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. वरील दोन्ही प्रकारच्या जुन्या वाहनांची यादी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तसेच परिवहन विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ लवकरच सोशल मीडियावर एक विशेष खाते सुरू करेल, ज्यावर नागरिक प्रदूषणविषयक तक्रारी करू शकतील, असेही न्यायालयाने सांगितले. यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसरातील जुन्या वाहनांवर बंदी घातली होती.