जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशकातून विरोध

0
5

पाण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला काही दिवस थांबवं लागणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशिक जिल्ह्यातून विरोध होतोय. तरीही पाटबंधारे विभागानं प्रवरा नदीतून पाणी सोडण्यासाठी तयारी म्हणून निळवंडे धरणात भंडारदरा धरणातून पाणी सोडून निळवंडे धरणाचा पाणीसाठा हा सव्वा आठ टीएमसी करुन ठेवलाय.

प्रवरा नदीपात्रात सध्या सिंचनासाठी कोटेशन सुरु असल्यानं नदीपात्रात पाणी वाहतंय. त्यात जायकवाडीसाठी १० हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे खात करतंय. मंगळवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करण्यात नियोजन केलं जातंय. त्यामुळे पाणी सोडण्यास गुरुवार उजेडतो की काय असं दिसतंय.

एकीकडे जायकवाडीला पाणी सोडण्याचा मुहूर्त लांबत असताना मराठवाड्यातले आमदार मात्र पाण्यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय.