जगातील तिसरा श्रीमंत देश बनण्याच्या मार्गावर भारत – मुकेश अंबानी

0
5

रिलायन्य इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (CMD) मुकेश अंबानी नवी दिल्लीत आयोजित २४ व्या MobiCom काँफ्रेसमध्ये सहभागी झाले होते. मोबाईल, कॅम्प्युटर, नेटवर्क्स आणि एल्गोरिदमच्या क्षेत्रात मोबिकॉमचे जगात महत्त्वाचे अंग आहे. मी नारायण मूर्ती यांचा खूप आदर करतो. त्यांचे भारताला ग्लोबल आयटी मॅपवर आणण्यामध्ये मोठे योगदान आहे. आज आपला जीडीपी ३ ट्रिलियन डॉलरच्या जवळपास आहे. भारत, हा जगातील तीन सर्वात श्रीमंत देशापैकी एक होण्याच्या मार्गावर आहे असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

तसंच यावेळी त्यांनी डेटा कनेक्टिव्हिटीसाठी मोठी घोषणा केली आहे. २०१९ पर्यंत भारतात ९९.९ टक्के जनतेकडे हायस्पीड डेटा कनेक्टिव्हिटी असणार आहे अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.