कुर्ला कामगार सोसायटीचा कचरा निर्मूलनाचा प्रयोग यशस्वी

0
11

अमरवाणी न्यूज, १९ जानेवारी – कुर्ल्यातील ‘कुर्ला कामगार सोसायटी’मध्ये सर्वांनी एकत्र येवून झिरो कचरा व्यवस्थापन खत प्रकल्प तयार केला आहे. हे खत २० रूपये प्रति किलो दराने विकले जाते. कुर्ल्यातील कामगार नगरमध्ये कुर्ला कामगार को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील सर्वांनी एकत्र येवून शून्य कचरा नियोजन करण्याचे ठरवले. त्यानुसार ७० इमारतीमधील ३८४ कुटुंबांचा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून रोज या प्रकल्पात आणला जातो. यामध्ये नारळाच्या वाळलेल्या फांद्या, शिळे अन्न, खराब झालेली फळे, भाजीपाला एकत्र करून वेगवेगळ्या हौदामध्ये टाकला जातो. ४० दिवसात यामध्ये उत्तम प्रतीचे खत तयार होते असून दररोज १० किलो खत या प्रकल्पातून तयार होते. चेंबूर येथील भाभा अनुसंधान केंद्रातील संशोधकांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी मोलाची मदत केली आहे.