कुख्यात गुंड अशोक पासवानची हत्या

0
7

नागपूरच्या खापरखेडा गावात चनकापूर येथे कुख्यात गुंड अशोक पासवान याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अशोक पासवानच्या हत्येमुळे संपूर्ण नागपूरात खळबळ उडाली आहे.

चनकापूर शनी मंदिरामागे अशोकचे शरीर आणि मुंडके वेगवेगळे आढळून आल्यानं परिसरात मोठं भीतीचं वातावरण आहे. अंतर्गत वादातून अशोक पासवानची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

आज सकाळच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांनी शनी मंदिरामागे अशोकचा मृतदेह पाहिला. शनी मंदिरामगे अशोकचे शरीर आणि मुंडकं वेगळं करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला होता. तर दुसरीकडे हत्या करून मृतदेह मंदिर परिसरात फेकण्यात आला की त्याच ठिकाणी रात्री अशोकची हत्या करण्यात आली याचा आता पोलीस शोध घेत आहे.

स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शरीर आणि धड वेगळं करून अशोक इतक्या निर्घृणपणे हत्या का करण्यात आली याचा आता पोलीस शोध घेत आहे.