किरकोळ वादातून युवकाला लोकलमधून खाली ढकललं

0
7

अमरवाणी न्यूज,२४ ऑक्टो: ठाण्याहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये किरकोळ वादातून युवकाला लाथ मारून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकारात मुंब्र्याचा जाशीर शेख हा मुलगा थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस युवकावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी एका संशियातला ताब्यात घेतलं पण चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं. मुंब्र्यातील अमृत नगरमध्ये राहणारा जाशीर शेख नोकरीच्या निमित्तानं मुंबईत जातो. मंगळवारी मुंबईमधून ठाण्यात धीम्या लोकलनं परतला. यानंतर त्याने ठाण्यातून बदलापूर लोकल पकडली. गाडीत चढताना एका व्यक्तीशी त्याचा वाद झाला.

लोकल खारेगाव फाटकाजवळ आल्यावर त्या व्यक्तीने दरवाजात उभ्या असलेल्या जाशीरला जोरदार दोनदा लाथ मारली. जशीर खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि शरीराला जबर मार लागला. घटना मुंब्र्यात समजल्यावर जशीरचे मित्र आणि नातेवाईक मुंब्रा स्टेशनवर जमले. अखेर लोहमार्ग पोलीस आणि मुंब्रा पोलिसांनी जाशीर ठाण्याला आणल्यावर वातावरण निवळलं.