काश्मीरी तरूणाशी लग्न करण्यासाठी पुण्याची तरूणी काश्मीरमध्ये, पोलिसांनी केली सुटका

0
9

श्रीनगर- जम्मू-काश्मीर, पोलिसांनी 25 जानेवारी रोजी मानवी बॉम्ब असलेल्या संशयातून अटक केलेल्या पुण्याच्या, तरूणीची आता सुटका केली आहे.  प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका 18 वर्षीय तरूणीला अटक केली होती. पोलिसांनी तरूणीची 10 दिवस कसून चौकशी केली होती. पण या चौकशीमध्ये काहीही समोर न आल्याने तिची सुटका करण्यात आली.  18 वर्षीय तरूणीच्या चौकशीतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर भेटलेल्या काश्मिरी तरुणाशी लग्न करण्यासाठी ती जम्मू-काश्मीरमध्ये आल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

पुण्यातील एक तरुणी प्रजासत्ताक दिनी जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी आली असल्याचं गुप्तचर यंत्रणांना सांगण्यात आलं होतं. यानंतर जम्मू -काश्मीर पोलिसांनी  २५ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरमधून तिला ताब्यात घेतलं होतं. पण पुण्यातील ही तरूणी कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नसल्याचं समोर आलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी तरूणीची दहा दिवस चौकशी केली, पण या चौकशीतून काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. म्हणून तिची सुटका केल्याचं समजतं आहे.