ऑडिट झाल्यानंतरही पूल कोसळला, ही बाब गंभीर – मुख्यमंत्री

0
19

‘मुंबईत सीएसएमटी परिसरात पूल कोसळल्याची दुर्घटना ही अतिशय दुःखद घटना आहे. या प्रकरणी उच्च स्थारिय चौकशी केली जाईल. साधारणतः मागील वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. मात्र, तो पूल कोसळत असेल तर गंभीर बाब आहे याची चौकशी केली जाईल. ही बाब गंभीर आहे’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ऑडिट झाल्यानंतर हा पूल कोसळला कसा याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मृतांच्या कुटुंबाला 5 लाख तर 50 हजार रुपयांची मदतही जखमींना दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.